HappiEdge Academy Logo
HappiEdge Juniors Campus

Future Ready Leaders..! घडवण्याची आधुनिक प्रयोगशाळा

आम्ही विद्यार्थ्यांच्या त्यांच्या क्षमतांना ओळखण्यासाठी वातावरण निर्माण करतो त्यामुळे मुले स्वतः त्यांच्या विकासासाठी सज्ज होतात, ज्यामुळे शाळेतच नाही तर त्यांच्या आयुष्यातही ते 'प्रो-परफॉर्मर' बनतात.

दृष्टिकोन (Our Vision)

"मानवी मूल्ये, संस्कार, खेळ, अनुभव आणि शालेय शिक्षण यांचा समतोल साधत प्रत्येक मुलाच्या सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया तयार करणे व Future Ready पिढी घडवणे."

ध्येय (Our Mission)

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी खेळ, अनुभव आधारित शिक्षण, गाणी, गोष्टी, संवाद, नाटक, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक भविष्य वेधी अनुभव केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जडण घडण करणे.

वय ३ ते १२ — एक निरंतर प्रवास

प्रत्येक टप्प्यावर मूल पुढे जातं, आम्ही सोबत असतो

वय ३
Early Riser (पाया रचण्याची सुरुवात)
वय ७
Riser (शिक्षणासाठी सज्ज)
वय ८
Commander (विज्ञान आणि गणित विषय ज्ञान)
वय १२
Future Ready Leader
0
तास रोज
0
मुख्य Skill Pillars
0
Stages वयोगट (Cohorts)
0
Holistic Development

प्रोग्राम निवडा आणि सविस्तर आराखडा पहा

गट १: Early Risers (वय ३ ते ७ वर्षे)

या वयात मुलांचा मेंदू ९०% विकसित होतो. त्यामुळे आम्ही पाठांतराला फाटा देऊन खेळांतून आणि कृतीद्वारे मुलांचा पाया भक्कम करतो.

Early Riser साठी मुख्य Activities: शारीरिक विकास, व मोटर स्किल्स साठी खेळ, योग आणि व्यायाम तसेच Creativity आणि बौद्धिक विकासासाठी अक्षरे, संख्या, आकार, रंग व भाषा ओळख आणि प्राथमिक संभाषण कौशल्य.

Child building blocks

१. बुद्धिमत्ता (Cognitive Mastery)

  • आकृत्यांची कोडी (Pattern Recognition)
  • एकाग्रता वाढवणारे मेमरी GAMES
  • बेसिक रंग, आकार आणि वस्तूंचे अचूक वर्गीकरण
  • 2D व 3D आकृत्यांची ओळख

२. कला व संवाद (Expressive Arts)

  • बडबडगीते आणि शुद्ध शब्द उच्चार सराव
  • कृतीशील गोष्टी ऐकणे आणि सांगणे (Storytelling)
  • म्युझिक, रिदम आणि सोप्या नाटुकल्यांमधून अभिव्यक्ती

३. शारीरिक विकास (Physical Power)

  • क्ले मॉडेलिंग व ओरिगामी (Fine Motor)
  • योगासने व बॅलन्सिंग खेळ (Gross Motor Skills)
  • आरोग्यदायी खाण्याच्या सवयी आणि हायजिनची समज

४. संस्कार व व्यवहार (Social & Moral)

  • स्वतःचे काम स्वतः करणे (बॅग भरणे, शूज घालणे)
  • 'थँक्यू-सॉरी' आणि बेसिक सोशल मॅनर्स
  • Shared (वाटून घेणे) आणि संघभावना रुजवणे

गट २: Risers (वय ८ ते ११ वर्षे)

हा वयोगट शाळा आणि बाहेरील जग समजायला लागतो. येथे आम्ही मुलांचे गणित, सायन्स आणि भाषिक कौशल्य अगदी प्रगत पातळीवर नेतो.

Risers साठी मुख्य भर: तार्किक क्षमता, स्टेज डेअरिंग आणि प्रगत व्यवहारज्ञान.

Kids doing science experiment

१. तार्किक गणित व सायन्स (Logic)

  • गंमतीदार गणित व वेदिक मॅथ्स: कॅल्क्युलेटरपेक्षा वेगवान आकडेमोड
  • घरगुती विज्ञान प्रयोग: प्रयोग करून विज्ञान शिकणे
  • अभ्यासाच्या सायकॉलॉजिकल पद्धती (Mind Maps & Quick Recall)

२. प्रगत पब्लिक स्पीकिंग (Expression)

  • इंग्रजी संभाषणाचा सराव (Phonics, Vocabulary)
  • नाटक (Drama) व म्युझिकद्वारे पूर्ण स्टेज डेअरिंग
  • स्वच्छ व स्पष्ट देहबोली (Body Language) प्रगती

३. शारीरिक ताकद व आरोग्य (Fitness)

  • मजेदार एरोबिक्स, झुंबा आणि स्टॅमिना बिल्डिंग गेम्स
  • अखाडा ताकद किंवा जिम्नॅस्टिक शारीरिक हालचाली
  • पोश्चर सुधारणे आणि न्यूट्रिशनचा अभ्यास

४. Always Ready Person (Leadership)

  • व्यावहारिक ज्ञान: पॉकेट मनी नियोजन (Money Management)
  • संघाचे नेतृत्व (Teamwork) आणि कठीण प्रसंगी निर्णय घेणे
  • प्रॉब्लेम सॉल्व्हिंग (Problem Solving) विचारसरणी

गट ३: Commanders (वय १२ ते १४ वर्षे)

हा टप्पा अभ्यासातील गांभीर्य आणि नेतृत्व कौशल्ये यांचा संगम असेल.

Teen students teamwork

मुख्य उपक्रम (Key Activities)

  • स्मार्ट स्टडी ट्रिक्स, माइंड मॅपिंग आणि मेमरी पॅलेस तंत्राद्वारे परीक्षेचा ताण कमी करणे.
  • प्रगत संभाषण आणि इंग्रजी स्टेज अँकरिंग, वादविवाद स्पर्धांची पूर्वतयारी.

Commanders Phase — Coming Soon

हा प्रोग्राम सध्या तयार होत आहे. लवकरच सविस्तर माहितीसह उपलब्ध होईल.

गट ४: Leaders (वय १४ ते १७ वर्षे)

हा अंतिम टप्पा मुलांना खऱ्या जगासाठी सज्ज करेल.

Young leaders presenting

मुख्य उपक्रम (Key Activities)

  • कंटेंट क्रिएशन: कॅमेऱ्यासमोर बोलणे, पॉडकास्ट रेकॉर्डिंग आणि देहबोली प्रगती.
  • व्यवहारज्ञान (बँकिंग व्यवहार, डिजिटल सेफ्टी, बिझनेस आणि उद्योजकतेचे प्राथमिक ज्ञान).

Leaders Phase — Coming Soon

हा प्रोग्राम सध्या तयार होत आहे. लवकरच सविस्तर माहितीसह उपलब्ध होईल.

दैनिक वेळापत्रक

Happi-Start

योग, प्राणायाम व ध्यान व हलके व्यायाम ज्यामुळे शाळेचा थकवा दूर होतो.

Logic Hub

गंमतीदार गणित कोडे, गणिताचे गेम्स, वेदीक गणित आणि हाताने प्रत्यक्ष प्रयोग करून शिकण्याची प्रवृत्ती.

Social Break

पाणी/खाऊची सुट्टी, मित्रांशी संवाद, आणि टीम गेम्स व शिष्टाचार.

Art & Speak

पब्लिक स्पीकिंग, इंग्रजी संवाद सुधारणा, ड्रामा (अभिनय), डान्स, किंवा कॅमेरासमोर बोलणे.

पालकांना निर्धास्त करणारी हमी!

"HappiEdge Junior Campus मध्ये घालवल्याने मुलांच्या अभ्यासाचे नुकसान होईल का?" — या पालकांच्या सर्वात मोठ्या काळजीला आमचे वैज्ञानिक उत्तर:

घरचा अभ्यास करण्यात गणित, इंग्लिश व मातृभाषा चा विकास

  • वेदिक गणित, गंमतीदार ट्रिक्स, आणि अनुभव आणि खेळातून शिक्षण असल्याने बाल वयातच मुलांची गणिताशी मैत्री होते आणि गणिताची भीती कधी वाटत नाही.
  • गंमतीदार प्रयोग आणि concept based शिक्षण पद्धतीमुळे मुलांची संकल्पना मजबूत होते त्यामुळे जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोण मजबूत होतो आणि विज्ञाना सारख्या विषयांना पाठांतरावर अवलंबून राहावे लागत नाही.

भाषेवर प्रभुत्व (मराठी/हिन्दी/इंग्लिश)

अभिनय, नाटक, कथाकथन, यांमुळे विद्यार्थ्यांची भाषेवरील पकड मजबूत होते व भाषेच्या विशेष तासांमुळे मुले स्वतः भाषा समजतात आणि लिहायला व वाचायला शिकतात. त्यामुळे त्यांना इंग्रजी आणि मराठी दोन्ही विषयात प्रगती करण्यासाठी वेगळ्या ट्यूशनची गरज पडत नाही.

निरोगी व नेहमी आनंदी राहणारी मानसिकता

योग, खेळ, व व्यायाम अश्या क्रीडा कौशल्यांमुळे मुलांची मानसिक आणि शारीरिक क्षमता अफाट वाढते. ती कठीण प्रसंगांना घाबरून न जाता आत्मविश्वासाने आणि 'Always Ready' भूमिकेत सामोरी जातात.
प्रवेश चौकशी

आपल्या मुलाचा भविष्याचा प्रवास सुरू करूया!

खाली फॉर्म भरा — आमचा टीम लवकरच आपल्याशी संपर्क साधेल आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देईल.

🔒 आपली माहिती पूर्णपणे सुरक्षित आहे. Spam नाही.

डेटा सुरक्षित २४ तासांत कॉलबॅक WhatsApp वर उत्तर प्रवेश चौकशी विनामूल्य

🎉 धन्यवाद!

आपली चौकशी यशस्वीरीत्या पाठवली गेली आहे. HappiEdge टीम लवकरच आपल्याशी संपर्क साधेल!

WhatsApp वर थेट बोला